Sunday, January 3, 2021

का असे वाटते मला

 

का असे वाटते मला

 

का असे वाटते मला

बोलत रहावं सदा आपल्याशी

व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने

मुक्त करावा मनाचा वारु सर्वांपाशी

 

का असे वाटते मला

आयुष्याचा अंतिम छंद

गुणगुणावा आपल्या सवे

सप्तसुरांनी कोमल मंद

 

का असे वाटते मला

इतक्या वर्षांनी खरी मैत्री

सापडली जणू भर उन्हात

मायेची सावली देणारी छत्री

 

का असे वाटते मला

मधुर क्षण आठवावं

आयुष्यातील सर्व दुःख

विसरून हसत जगावं

 

का असे वाटते मला

आयुष्याच्या संध्या समयी

आपल्या सर्वांची  सोबत

अशीच नेहमी लाभावी

 

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...