Sunday, January 3, 2021

घरटं सोडुन जाताना

 

घरटं सोडुन जाताना

🏠 

भावनांच्या उद्रेकाने काया थरथरली,

हिमतीचे पाषाण ही मनावर कडाडली

अश्रू पुरा बरोबर स्वप्न माझी वाहु लागली

घरटं सोडुन जाताना आठवणी मागे राहिली

 

कणकण विखरलं आयुष्य क्षणक्षण जोडुन कसे

मणमण ओझ्याखाली दडु लागले हलकं करु कसे

मनाच्या आकाशाला पडली अनंत छिद्रे शिवु कसे

घरटं सोडुन जाताना दुःखा ची शिदोरी घेऊ कसे

 

असंख्य प्रश्र्नांच्या वादळात

उत्तर मिळाले नाही

आशेची साखळी पाय आता रोखु शकली नाही

जरी घट्ट काळोखात विज ही चमकली नाही

घरटं सोडुन जाताना चिंता सुद्धा अडथळा बनली नाही

 

काळेकुट्ट ढग निराशेच्या पाउस पाडणार

की एखादा काजवा अल्पसा चमकणार

शब्द तलवार छातीत वार करणार

घरटं सोडुन जाताना


      आकाश करपले अवनी कोपली 
धुकं दाटले दिशा हरवली 
डोळ्यातील सुनामी गालांवर 

ओघळली घरटं सोडुन जाताना 

घेऊन आठवणींची शिदोरी

प्रेमाच्या पाण्याची झारी

मित्रांच्या शुभेच्छांची छत्री

बऱ्यावाईट कर्मांची ओझी

घरटं सोडुन जाताना अनंत यात्रेसाठी निघताना

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...