Saturday, January 30, 2021

विषय - घर

 विषय - घर


बांधलं घर स्वप्नांचे कुणी

निसर्गाच्या रम्य सानिध्यात

झाडाच्या कुशीत इवलेसे 

घरटं  जणू  माळरानात


प्रितीच्या रंगानं रंगवून उभ्या

केल्या वात्सल्याच्या भिंती

जगातील कोलाहला पासून

दूर मिळवण्या मन: शांती


गार वारा पाऊस अन् चांदणं

प्राणी पक्षी यांची मांदियाळी

स्वर्ग सुखाचा जसा बंगला

वास्तव्यास जणू वनमाळी


ओमप्रकाश शर्मा

नाशिक

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...