आयुष्य डिजिटल
यंत्र युगातून आयुष्य
तंत्र युगात शिरले
तंत्र युगातील जीवन
अवघं डिजिटल झाले
बॅंक पैसा डिजिटल
डिजिटल पत्र संदेश
समाचार पत्र डिजिटल
डिजिटल कॅंडी क्रश
टी वी मोबाईल डिजिटल
डिजिटल सिनेमा नाटक
नाते संबंध डिजिटल
डिजिटल झाले फाटक
शब्द वाक्य ओळी डिजिटल
डिजिटल झाल्या कविता
लेख कथा डिजिटल
डिजिटली वाहते शब्द सरिता
डिजिटल लग्न करून
प्रेम झाले डिजिटल
डिजिटल दरवाजा आहे
तर चोरी सुद्धा डिजिटल
Out dated आयुष्याला
नव्या जोशात Update करा
स्वप्न download नाही तर
आपल्या memory त ठेवा
संवेदनाचा virus उत्साहाच्या
Antivirus ने दुर करावा
दुःख send करण्यासाठी
मैत्रीचा network वापरावा
पावसाळा उडून गेला तर
सिंचनाने undelete होतो
Hang PC मधील junk
दुर्विचारासारखा झटकतो
जाती माती website ने
नाही शुद्ध निर्मळ मनाने
अहंकारी mute सोडून
थोडा खुल्या दिलाने
विज्ञानाची गुलामगिरी नाही
त्याचावर होऊन करा स्वारी
Whatsup Facebook ने
येईल नात्यात नवी उभारी
डिजिटल ॐ
No comments:
Post a Comment
Thanks for the comments