माझी शब्द फुले
ओठांवर तव
करीती मधुर
मृदु कलरव
शब्द काव्य असं
ओठी नाचतीया
पाझरती डोळे
भाव होवूनीया
तुझीया सुंदर
मुखी सजवून
शब्द फुले आली
स्पंदन बनून
शब्दांचे चांदणे
साज मोतीयाचा
मुखचंद्रांतुन
वाहे अमृताचा
शब्द रस धारा
स्वरांनी मधुर
छेडले असता
मंत्रमुग्ध सूर
ओमप्रकाश शर्मा
नाशिक
No comments:
Post a Comment
Thanks for the comments