Sunday, February 28, 2021

उशी

 उशी 




उशी मी तुझ्या रात्रीची साथी

प्रणयी सप्तरंगी इंद्रधनुष्याची

उशी मी तुझ्या विरहात साक्षी

ओघळणाऱ्या अश्रू धारांची


कधी झाले डोक्याला आधार

तर कधी प्रेम युद्धात ढाल

कधी झाले मी सिमा रेखा

ओलांडून सोडु नये ताल


डोळे मिटून काय पाहिले वा

पडलेली कुजबुज बंद कानावर 

कसं सांगू रेशमी तो हळवा स्पर्श

थरथरती गच्च पकड हातांवर


ठेवले सर्व गुपित रम्य प्रेम

प्रणव नटखट तक्रारींचे

चादरीच्या सल करतात 

उघड प्रयत्न सांगण्याचे

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...