*लाॅकडाऊन इफेक्ट*
आज सुर्यही उगवला
ढगांचा मास्क लावून
मेघांच्या बॅरिकेडने धरले
रवि किरणांना रोखून
खट्याळ वारा मात्र
धावत होता गुपचिळी
झाडांच्या अवतीभवती
लपंडावाची करून खेळी
स्वैर उडणाऱी पक्षी बघून
विज कडाडली ढगातून
क्वारंटाईन होण्या घरात
पक्षी परतली घाबरून
©ॐप्रकाश
No comments:
Post a Comment
Thanks for the comments