Sunday, June 20, 2021

शब्दांजली

 FATHERS' DAY


के उपलक्ष मे कुछ यादे


*शब्दांजली*


पत्र हे पाहताच स्मरे

ती एक काळोखी रात्र

मनाचा थरकाप उडतो

आठवून दुर्घटना मात्र


आभाळ कोसळत होता

गुपचिळी असहाय्य मन

कसे करावे पाषाणाचे

हृदयावर आघात सहन


पायाखालची कृतघ्न धरा

 भयानक थरथरली होती 

काळजाचा ठोका चुकत

अश्रूधारा नयनी ओघळती


आशिर्वाद देणारे हात अन् 

अबोल मायेचे छत्र हरपले

सजल नेत्रांनी बघत बघत 

ते पवित्र चरण निघून गेले


*©ॐप्रकाश शर्मा*

🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...