मृगाची चाहूल
मृगाची लागताच चाहूल
नृत्य करण्यास सज्ज मयुर
कोकिळेच्या कंठातून गुंजती
आसमंतात सूर मधुर मधुर
नवचैतन्य भरेल सृष्टीत प्राण
पाऊसरुपी दान घेऊन नभाचं
अमृतधारा नभातून सांडतील
ऋण फेडण्यासाठी अवनीचं
झाडी पाने फुले नाजूक वेली
सजेल धरती हिरव्या शालूने
ढगांचा रथावर आरूढ होऊन
येईल मृगाच्या पहिल्या धारेने
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments