*ये ना प्रिये*,
सोड तु आता सुरकुत्यांची चिंता
मी आहे ना तुझ्या स्मित हास्याने घायाळ व्हायला
ये ना प्रिये
सोड तुझ्या कृष्णधवल केसांची बटा
मी आहे ना तुझ्या
केसांच्या छायेत धुंद व्हायला
ये ना प्रिये
सोड तुझ्या स्थुल होणाऱ्या कायेची काळजी
मी आहे ना तुझ्या हृदयात घ्यायला झोका
ये ना प्रिये
सोड आता मधुमेहाची भिती
मी आहे ना तुझ्या स्मित गोड
हास्याचा घ्यायला मोका
ये ना प्रिये
सोड तव कांती ची चिंता
मी आहे ना तुझ्या नयनात
प्रणव प्रित बघायला.
ये ना प्रिये
सोड आता लडखडत्या पायांची कळकळ
मी आहे ना तुझ्या पावलात
आधार काठी व्हायला
ये ना प्रिये
सोड आता थरथरत्या हातांची ॲंझायटी
मी आहे ना तुझ्या हातात
हात घालून मिठीत घ्यायला
ये ना प्रिये
सोड आता कोरोनाची चिंता
मी आहे ना तुझ्या बरोबर
बंदीस्त होऊन साथ द्यायला
ये ना प्रिये
सोड आता जगाची काळजी
मी आहे ना तुझ्या संगतीला
विसरून सर्व ध्यानस्थ बसायला.
No comments:
Post a Comment
Thanks for the comments