🌹सुप्रभात🌹
डोंगराच्या माथ्यावर येऊन
विसावला होता एक ढग
खट्याळ वारा गुदगुल्या करत
आकाशी पळवत होता ढग
भास्कर लपूनी मेघांच्या आड
पहात होता सुंदर मनोरंजन
पाखरे दडून बसली घरट्यात
बघती डोळ्यात घालून अंजन
वृक्षवल्ली होवून प्रसन्न वाट
पाहत होती अमृत धारांची
मयुर कोकील पक्षी अंगावर
घेण्या बरसणाऱ्या मोत्यांची
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments