Saturday, June 12, 2021

ऑनलाईन कट्टा

*ऑनलाईन कट्टा*

कोरोना आला आणि
ज्येष्ठांना दिला कंटाळा
स्वास्थ्यासाठी म्हणून
कट्टा ऑनलाईन  झाला

मनसोक्त आनंद होता
करुन मजा अन् थट्टा
संपर्क टाळावा म्हणून
झाला ऑनलाईन कट्टा

आपुलकीची गळाभेट संपली
संपलं प्रेममय हस्तांदोलन
ऑनलाईन कट्ट्यावर हसत
आता करावं लागतं मनोरंजन

दुधाची तहान ताकावर
लागते आता भागवावी
प्रत्यक्ष भेटी ऐवजी आता
स्क्रिन वर तोंड बघावी

आतुरतेने वाट पाहतात
कोरोना संपून जायची
ऑनलाईन कट्टा अखेर
बंद करून भेटायची

©ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...