Wednesday, June 9, 2021

मित्र

 *मित्र*


मनाच्या अश्वावर स्वार होऊन

भेटून यावे सर्व मित्रांना

उडावे आठवणींचे पंख लावून  

हळूच गोष्ट सांगावी दोस्तांना


आम्हा मित्रांची एक शाळा व

शाळेचा फळा काळा होता

पण सर्व मित्रांचा स्नेह मात्र

खडू सारखा शुभ्र होता


जन्म कुंडली मध्ये शनी

मित्र असेल तर नडत नाही

मित्रांची दृष्टी कधी वक्री आहे

असं संकटात ही घडत नाही


समस्यांच्या वादळात मैत्रीचे

ढग प्रेमाचा पाऊस पाडतात

आनंदाचा डोहात हातात हात

घेऊन मित्र मनसोक्त नाचतात


©ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...