हरी विश्वावर नभातून चंद्र
होता शितल चांदणे शिंपीत
हिरवी सुंदर चादर ओढून
होती चांदणीला खुणवीत
बघून गंमत बागडणाऱ्या
इवल्या इवल्या ताऱ्यांची
थंडगार वाऱ्याचा स्पर्शाने
आनंदली हृदये फुलांची
इर्शेने पेटून पांडव लेणी
काळोखात लपून बसली
हे बघून निशिगंध कळी
खुदकन उमलून हसली
No comments:
Post a Comment
Thanks for the comments