Tuesday, September 28, 2021

पाऊस तांडव

 

चिंब चिंब भिजले नाशिक

पारदर्शी पावसाच्या धाऱ्यांनी

भरून तुडुंब वाहत आहे

गोदामाई पाण्याचा लाटांनी


चिंब भिजल्या वाटा अन् रस्ते

न्हाऊन निघाले वृक्ष वेली

चिंबचिंब झाली पानं फुलं

डोंगर घाट न्हाऊन गेली


चिंब चिंब पडत होत्या सरी

चिंब चिंब भिजली वसुंधरा

ओढे नाले अन् नद्या भरली

भिजून गेला आसमंत सारा


'गुलाब' पावसाच्या स्पर्शाने

रमनिय कायाही भिजली

खट्याळ झोंबत वाऱ्याने

एकांतात हसून लाजली


नकोस रे नभा डोळे वटारु

राग वहातोय रे बघ ढगातून

आवर घाल तुझ्या तांडवला 

उगाच बळीराजा रडेल बसून


©ॐप्रकाश शर्मा

#पाऊस 

#नाशिक

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...