Thursday, September 30, 2021

मंगलाताई कुंवर

 माजी अध्यक्षा संघाच्या 

नावाप्रमाणे मंगल करणाऱ्या

अनुभवाची शिदोरी घेऊन

मंगल क्षण उधळण्याऱ्या


पहिल्या महिला अध्यक्ष

पदाचा मिळवून मान

वाढविली गोविंद नगर ज्येष्ठ 

नागरिक संघाची शान


प्रेमळ स्वभावाला आपल्या

समजुतदारपणाची सुंदर जोड

उर्वरीत आयुष्य हे जावं

 सर्वांसह गोड अन् गोड


आपणास ७५ व्या वाढ दिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा

आरोग्य सुख समृद्धी लाभो व शतायुषी होवो हीच आम्हा सर्वांची सदिच्छा


प्रसन्नतेची पालवी फुटून 

आनंदाचा बहर यावा

अमृत महोत्सवी वर्षात

समाधान मनी मिळावा


आयुष्याच्या आपल्या अंगणी

सुंदर पारिजातकासम हर्षाचा

रोज मनाच्या गाभाऱ्यात

सडा पडावा उल्हासाचा


मुलं सुना नातवंडांच्या

गोड सहवासात जावे

विविध फुलांच्या बागेसारखं 

प्रफुल्लित आयुष्य व्हावे


©ॐप्रकाश शर्मा

🎉🎂🎉🎂🎉

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...