Wednesday, October 6, 2021

निम्न तापी

 प्रचिती पेरलेल्या प्रेमाच्या

आठवणी रुपात अवतरली

ओठांनी बंदिस्त मौन शब्द 

हृदयात क्षणभर थरथरली


निखळला तारा आकाशी

कवटाळण्या चांदणीला

प्रेमाची ती धुंद झेप बघून

प्रेमभरती आली सागराला


तुझ्या अधिर ओठांनी हळुच

रसीली मधुशाला टिपली

प्रणव तृप्तीचा आनंद घेत

निम्नतापी कुशीत विसावली

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...