बघुनी हसरा
सर्वांचा चेहरा
होईल दसरा
संघासाठी
हाच क्षण माझा
सुंदर दसरा
होवून हसरा
सर्वांसाठी
आपल्या सर्वांचा
नित्य भेट व्हावा
दसरा रहावा
सर्वामना
उत्सव आपला
संस्कृती पर्वाचा
विजय सत्याचा
मिलनाचा
दशमी विजया
प्रतिक शक्तीचा
सुवर्ण दानाचा
शुभेच्छांचा
सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणं
सजली तोरणं
दसऱ्याची
आंब्याच्या पानांनी
झेंडुच्या फुलांनी
रांगोळी काढूनी
स्वागताची
No comments:
Post a Comment
Thanks for the comments