नात्यांच्या मोबाईल मध्ये
ॲप डाऊनलोड करु कसे
भावनेचे नेटवर्क न मिळता
मनाचे संदेश पाठवू कसे
मनातल्या स्वप्नांना पंख
पसरूनी नभी उडवू कसे
अपेक्षांच्या भाराने हॅंग
निसंकोच संपर्क साधू कसे
स्लो नेटवर्क असताना ही
आठवणींच्या पूर वहातो
अफवांच्या बाजारात डोळे
बंद करून विश्वास ठेवतो
जवळच्यांच लोकांकडून
ज्यावेळी मनात हैराण होतो
अश्रूंना देऊन वाट भार
हृदयाचा हलका करतो
No comments:
Post a Comment
Thanks for the comments