आरोग्याचा वृक्ष करपतो
किड आळसाची लागून
अन् व्यसनाधीनता ग्रासता
पडतो चक्रव्यूहात अडकून
निराशेच्या काळोखात मग
एकलता बनते संगिनी
सद्विवेक सद्बुद्धी सह
विचार जातात सोडूनी
धन नाश पावून जातो मान
रुजते बदनामीची 'सिड'
योग प्राणायामाने करा नष्ट
आळसाची लागलेली किड
आशेचा किरण येईल घरी
विवेकाची बाग फुलवून
आरोग्याचा दिसेल सुंदर
इंद्रधनुष्य क्षितीजावरुन
आळस, नैराश्य झटकूनी
व्यायामाचे पाणी शिंपडुया
सुवर्णमय आयुष्याची बाग
पुन्हा एकदा सुरेख फुलवुया
No comments:
Post a Comment
Thanks for the comments