गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाची कोजागिरी.
*******
दिनांक :२२/१०/२०२१
*आजचा उपक्रम :
विषय : आज सजली कोजागिरी...
आज सजली कोजागिरी
आली सभासद मंडळी दारी
आले दादा बापू अन् अप्पा
आल्या ताई नेसून साडी भारी
गजबजले सभागृह
भरगच्च भरलं पटांगण
प्रसन्न झाली तरुवेली
आनंदाने भरले अंगण
चांदण्याचा पाऊस पडून
शितल धुंद आसमंत होणार
मंद मंद प्रकाश आज
वसुंधरेवर उधळणार
आठवणी यौवनाच्या
साकार करण्यासाठी
रिता मनाचा गाभारा
हर्षा ने भरण्यासाठी
आई माई अन् ताई अमुच्या
झुम्मा फुगडी खेळणार
चंद्र चांदणे शिंपीत अमृत
वर्षावाचा सडा टाकणार
चांदण्यांचा आकाशी
दिसे अनोखा नजारा
वारा रात्रीचा थंड थंड
अंगी फुलवी शहारा
अनेक पदार्थांची आरास
इथे आई लक्ष्मीचा वास
शरद पौर्णिमेची अमृत वर्षा
आनंदात जागरण खास
No comments:
Post a Comment
Thanks for the comments