आजोबा अन् नातू
नातूशी जुळताना हे नाते
अंगाअंगातून अत्तर झरते
श्वासही होऊन सुगंधित
तन मन सारे प्रसन्न होते
मोरपीसी स्पर्श तयाचे
फिरते जेंव्हा गालावरूनी
देहभान मग विसरून सुख
अनुभवतो मिटून नयनी .
पारिजात जणू बहरले
कमळेही फुलून आली
मोगऱ्याच्या सुगंधाने घरं
आमचीही बहरून गेली .
नातूशी माझे जुळताना नाते
प्रीतीचा सागर मनी उसळतो
आनंदाचा चंद्र हा नव्याने
असा का आरक्त होतो
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments