Sunday, December 12, 2021

करिसूत

 *करिसूत*


एक सुंदर फुल उमलले 

मुखावर चंद्राचं तेज घेऊन

नभी असलेला एक तारा

अवतरला गोजिरे रुप घेऊन


बाई बाबूजींच्या आशिर्वादाने

आकांक्षेची झोळी भरली

शर्मा फॅमिलीच्या पुस्तकाला 

सुवर्ण प्रस्तावना लाभली


सुरु झाला नवा अध्याय 

कपिल रिचा यांच्या जीवनी

वसंत सुषमा यांना वाटे

आला राम अवतार घेऊनी


भाग्यवंताचा आगमनाने

मधुर सुगंध दरवळला 

औक्षण आनंदाचा करुन

भास्कर दारी उगवला


साजिरे रुप ओंजळीत बघून

आकाशी चंद्र ही लाजला

आयुष्यात आता सप्तसुरांचा

जणू सुंदर ढोल वाजला

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...