*वर्धापन दिन संध्याछाया*
विठ्ठल देवरेंची छाया
लावली ज्येष्ठांनी माया
आला क्षण आनंदाचा
गोड दिवस वर्धापनाचा
ताई दादा अन् बापु
येतील सर्व ज्येष्ठ
रम्य खेळ खेळूनी
होतील प्रसन्न श्रेष्ठ
सभागृहात संध्या छायेच्या
होतील हर्षाने सर्व गोळा
हा हा म्हणता म्हणता
जमेल महा ताऱ्यांचा मेळा
आजी आजोबांच्या अंगात
संचारेल उत्साहाचे वारे
सुख दुःखाचे विसरून क्षण
आनंदाने नाचतील सारे
मा. सिमाताई आल्या
आले महापौर श्री सतिश
ह्या सुंदर वर्धापन दिनी
प्रसन्नतेची होईल आतिश
होईल मंत्र मुग्ध मेजवानी
प्रदिप वाघ यांच्या संगीताची
सुर ताला बरोबर आस्वाद
सुंदर सुरुची भोजनाची
हळूहळू गडद होणाऱ्या सावलीत
घेऊन आला आशेचा एक किरण
सर्व सभासदांच्या जीवनात
संध्याछायेचा हा वर्धापन दिन
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments