ज्येष्ठांरण्य
ज्येष्ठांचे थवे अवतरतात
विविध रस्त्ते अन् वाटांनी
जसं सजावं पक्ष्यांचं सुंदर
अभयारण्य विविध रंगानी
विचारांच्या दुर्बीणीतून
बघतात भुतकाळाचे रंग
संघाच्या मंचावर चढून
प्रेमाने होतात दंग दंग
झेपावत पक्षी रुपी ज्येष्ठ
भावनांच्या विशाल आकाशी
नाशिकच्या ज्येष्ठारण्यात विहरतो
बाळगून एक आशा उराशी
असंख्य ज्येष्ठांचे अभयारण्य
नाशिकच्या ह्या रम्य शहरात
सजतात बाकांवर मंदिर बाग
अन साठीच्या एकल जगात
मनमोकळे हास्याचे फवारे उडवून
विसरतात मनातील तणाव
एकमेकांच्या संगतीत दूर करतात
जीवनाच्या निराशेचा प्रभाव
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments