Sunday, May 26, 2024

कप चहाचा*

 कप चहाचा* 




सकाळी चहाचा सुवास येता,


प्रारंभ दिवसाचा छान होतो।


साखर आल्याचा उष्ण चहा,


शरीरामध्ये ऊर्मी आणतो।




उठवून साखर झोपेतूनी 


उत्साहाने सजीव करतो।


कधी पत्नी, कधी मित्रा सोबत,


सर्वांचा सखा हा चहा बनतो।




गरमागरम वाफेच्या लहरी,


गप्पा टप्पा रंगवतो हसरी।


कामातही तो साथ देतो,


संपूर्ण दिवसाला ऊर्जा देतो।




कडक, गरम आणि गोड,


अमृततुल्य चहाचे क्षण


आयुष्याच्या होतो पाडवा


जेंव्हा सजवतो आठवण 




तोच चहा, तोच आपला मित्र,


तेच जीवनाचं अमृत।


चहाच्या एका घोटात,


समजून येते चहाचे महत्व




*ओमप्रकाश शर्मा*

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...