Thursday, January 28, 2021

आठवडा

 आठवडा 


आठवडा सुरू करा

शिवपुजा सोमवारी

गजानन विनायक 

सेवा ही मंगळवारी 


रामकृष्ण रामकृष्ण

करुनिया बुधवारी 

गुरू दत्त दिगंबर

आठवावा गुरूवारी


शुक्रवारी लक्ष्मीदेवी

कुंकु हळद पुजावे

शनिवारी हनुमान

तेल सिंदुर अर्पावे


सुट्टी दिवस आहेच

रविवारी रस्सावडा

खाऊनिया आनंदात

पुर्ण करा आठवडा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...