ओसाड माळरान
हृदय हेलावून हे माझं
ओसाड माळरान बनले
न शब्द बोलले काही
न अश्रु ही ओघळले
मनाच्या भावना आटल्या
उपसुन कधी आठवणी
ओसाड माळरान बनले
वेदनेच्या ह्या साठवणी
कल्पनाशक्ती संपली होती
अबोली रंगवलेल्या भिंती
ओसाड माळरान बनले
ओळीत हरवले शब्द किती
मनाचं फुलपाखरू उडायचं
नाही आता इथे बागडले
आशेची फुलं कोमेजून
ओसाड माळरान बनले
पडेल कधी आकांक्षेचा बिंदू
बीज अंकुरित करण्या
माळरान फुलवून प्रेमभाव
स्वर्गासम सृष्टी होण्या
No comments:
Post a Comment
Thanks for the comments