Thursday, January 28, 2021

माझं आवडतं राज्य- गुजरात

 


माझं आवडतं राज्य- गुजरात


आवडतं राज्य आहे माझं

 जय जय गरवी गुजरात

झाले औद्योगिक प्रगत राज्य

करुनी सर्व अडचणींवर मात


खमंग ढोकळा फाफडा अन्

गोड जलेबी खाऊया मजेदार

सुरती घारी आनंदची खमणी  

अडदीया खाऊया शानदार


अक्षरधाम द्वारका सोमनाथ

अशी पवित्र तिर्थक्षेत्रे शानदार

विरपुरचे जलाराम बाप्पा

बाप्पा सिताराम जानदार


सुंदर रस्ते आणि महामार्ग

बीआरटीएस नं वन जगात

आय आय एम आहे प्रसिध्द

बरोडा सुरत शहर भारतात


नवरात्री गरबा उत्सवात

खेळुया मनसोक्त रास

उत्तराण मध्ये घेऊन मज्जा

करुया पंतगबाजी खास


No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...