Tuesday, January 12, 2021

भाज्यांची अंगणवाडी

 भाज्यांची अंगणवाडी


बटाट्याच्या चाळीत सुरू 

केली सुंदररीत्या अंगणवाडी

नाजुक भेंडी राणी आली 

नेसून हिरवी हिरवी साडी


टाटा करून आला टमाट्या 

सोबत मटरुला घेऊन आला

एका पायावर नाचत येऊन 

वांग आणि रताळ्या नाचला


आढेवेढे घेत आलं 

नाक मुरडत म्हणाले

लिंबु टिंबु आणि मिरची

जवळ जवळ बसले


तोंड दाबून तोंडले

पडवलचा मागे बसले

लाल लाल बिटरुटने

शेपु  पालकात फुट केले


मुळातच मुळा हुशार

बसला बाकावर पहिला

तांबडा भोपळ्याचे पाहुन

मोठे पोट आवळा हसला


मेथी आणि कोथिंबिरीची

पहिल्या दिवशी झाली गट्टी

सुरण आणि भोपळा भांडण

करून करून बसले कट्टी


कोबी कारले अन्  कंटोळी 

सर्व रांगेत एका बसली 

साडीतील भेंडी बाईंनी

भाज्यार्थ्यांची हजेरी घेतली


ओमप्रकाश शर्मा

1 comment:

  1. भेंडी बाई काय शिक्षा देतात हे पुढील काव्यात अपेक्षित आहे.

    ReplyDelete

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...