Wednesday, February 17, 2021

मला कवी होणे जमलं नाही

 

मला कवी होणे जमलं नाही,

भावनेची शाही  प्रेरणेचा पेनात भरणं

मनात उठलेले रोमांच शब्दात पकडणं

शब्दात शब्द गुंफून दोन ओळी लिहणं

हृदयातील प्रेमाचे तरंग कागदावर उतरवणं

जमलं नाही

मला कवी होणे जमलं नाही

 

वेदनेच्या अश्रूंना शब्दात व्यक्त करणं

आनंदी क्षण वेचून कागदावर लिहणं

जिवन प्रसंग कॅनव्हास वर रेखाटणं

ओठावरील अर्धवट वाक्य पुटपुटणं

जमलं नाही

मला कवी होणे जमलं नाही

 


No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...