Sunday, February 7, 2021

तुझी नी माझी ती भेट

 तुझी नी माझी ती भेट

अजून ही स्मरणात आहे

तन मन आजही त्या

आनंद डोहात आहे


स्पर्श सुखाचा तो सागर

वाट बघतोय क्षणोक्षणी

तुझी नी माझी ती भेट

होईल का पुन्हा एका क्षणी


तुझी नी माझी ती भेट घडली

अनोळखी न तु मला वाटली

जीवन रस पान तुझे

आतुर होते मन माझे


तुझी नी माझी भेट ती

क्षणीक पण अनंत भासणारी

परमानंदाच्या अत्युच्च शिखरावर

नेऊन हृदयात साठवणारी


तुझी नी माझी ती भेट

पाण्यात हळूहळू तरंगत

चांदण्यात आकाशाच्या थेट

तशीच रेशमी स्पर्श आठवत


तुझी नी माझी भेट ती

स्मरते मला पदोपदी

काहुर उठलयं पुन्हा एकदा

ओढ लागुनी  मिलन कधीं


तुझी नी माझी भेट ती

आठवणीत अजुनही माझ्या

थरथरत्या स्पर्शाची भाषा

स्मरणात असेल का तुझ्या

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...