*शरदः शतम् जीवेत*
अनुष्का आमची सदाफुली
सारखी नाजूकतेने बहरली
मधुर स्मित हास्य बघून
निशिगंध कळी ही लाजली
बघता बघता पवनकन्या ही
अठराची सुंदर युवती झाली
मोठी झाली आज स्वातीची
हीलाडकी नाजूक बाहुली
घरात बागडणाऱ्या फुलपाखरा
इंद्रधनुषी हार्दिक शुभेच्छा
सुख समृद्धी लोळन घेवो
पायी तुझीया हिच इच्छा
यशाची घेऊन उत्तुंग भरारी
करो साकार स्वप्न आजीचे
मिळो नावलौकिक ह्या
जगी ध्येय गाठत आजोबांचे
सरिता
🎉🎂🎉🍫🎉

No comments:
Post a Comment
Thanks for the comments