*गटारी*
साजरी केली नवी गटारी
आषाढीच्या अमावस्येला
असंख्य विचार भावना
शब्द बोलावल्या पार्टीला
सांज समयी सुंदर
विचारांचे दिवे लावून
मन काळोखाला म्हणालो
पळ काढ आता येथून
धुंद होऊन गेलोय नशेत
काव्यांचे रिचवून पेग
उपमा अनुप्रास अलंकार
व्यंग असा चकना सुरेख
कधी समाजाला शाब्दिक
तोल सांभाळत फटकारले
कधी मनातले मिश्र भाव
अलगद गालावर सांडले
क्रोध क्लेश निराशा यांना
दिले गटारीत लोटून
केला नवा नवा नशा
आनंदाचा डोहात न्हाऊन
अशी केली गटारी स्पेशल
आठवणींच्या विश्वात रमून
भावस्पंदन मनोरंजन केले
कवितेच्या ओळी सजवून
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments