नांव
शेक्सपिअर सांगे सर्वा
असे काय आहे नावात
पण खरं सांगू तुम्हाला
नावातच आहे खरा आव
अतीशय सोपं नांवं ठेवणं
कष्टप्रद आहे नांव कमवणं
अगदी सरळ नांव लिहिणं
कठिण असते त्यास अर्थ देणं
पराक्रम आठवे घेता
नांव छत्रपती शिवबाचे
स्फुरण चढे रोमारोमात
नांवाने त्या भगत सिंगाचे
आदर्श दिसे मज नांव
घेता प्रभु श्रीरामचंद्राचे
प्रेम ज्ञान भक्ती कर्म स्मरता
नांव योगेश्वर श्री कृष्णाचे
शब्दांच्या देशात पर्यटन
होते घेऊन पुलंचे नांव
ऐकवते मधुर सुरांची जादू
घेता लता दिदींचे नांव
अशी महती असे घेता
ऐकता स्मरणात नांव
न कळे अन्यथा काय अन्
कुणाचा कशात आहे ठाव
No comments:
Post a Comment
Thanks for the comments