Monday, October 3, 2022

प्रार्थना

 *प्रार्थना*


शक्ती अन् स्फूर्ती देवी  

वंदन तुजला मी करीतो

आशिर्वाद सदा असावा

मनी आशा मी बाळगतो 


हृदयातील भक्ती भावना

शब्दांच्या ओळीत गुंफीतो

साकारून मनात कल्पना

काव्यपुष्पं चरणी अर्पितो 


भक्तीफुले शब्द रुपात

तव मंगल चरणी वाहतो

तुझी करुनीया ही अर्चना

नवरात्री ह्या पदी प्रार्थितो 


काव्यरस हा असाच झरुदे

बहरून सुगंध अंतरी पसरुदे

ठेवा आनंदाचा मनी सदा

अन् ढेकर तृप्तीचा घेवुदे


*©ॐप्रकाश शर्मा*

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...